पायाभूत सुविधा

गावामध्ये मूलभूत सुविधा उत्तम प्रकारे उपलब्ध आहेत. ग्रामपंचायत इमारत सुस्थितीत असून ग्रामविकासाच्या विविध योजना व उपक्रम येथे राबवले जातात. पाणीपुरवठा योजना नियमित सुरू असून गावातील प्रत्येक घराला स्वच्छ पाणी उपलब्ध केले जाते. स्वच्छतेसाठी ग्रामपंचायतीमार्फत स्वच्छ भारत अभियानांतर्गत नियमित साफसफाई केली जाते.

रस्ते आणि रस्त्यावरील दिवे सुस्थितीत असून गावामध्ये वाहतुकीस सुलभता आहे तसेच रात्री प्रकाशाची सोय उपलब्ध आहे. गावात शाळा आणि अंगणवाडी केंद्रे असल्यामुळे बालकांचे शिक्षण आणि पोषण यावर भर दिला जातो.

गावात आरोग्य केंद्र उपलब्ध असून प्राथमिक आरोग्य सेवा व औषधोपचार दिले जातात. स्वयं-साहाय्य गट केंद्रांमार्फत महिलांच्या आर्थिक सबलीकरणासाठी विविध उपक्रम राबवले जातात.

तसेच बसथांबे व संपर्क सुविधा उपलब्ध असून गावाचा शेजारील गावांशी उत्तम संपर्क आहे. नियमित आरोग्य शिबिरेलसीकरण मोहिमा राबवून गावकऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेतली जाते.

सौर ऊर्जा योजना – ग्रामपंचायत कार्यालय तसेच वरचे टेंभ्ये नळ पाणीपुरवठा योजना येथे सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित करण्यात आला आहे. या योजनेमुळे वीजबचत होत असून पर्यावरणपूरक ऊर्जेचा वापर वाढीस लागला आहे. सौरऊर्जेच्या माध्यमातून गावामध्ये स्वयंपूर्ण आणि शाश्वत विकासाला चालना मिळत आहे.